राज्यसभा सरचिटणीसपद पी. सी. मोदी यांच्याकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 पी. सी. मोदी

राज्यसभा सरचिटणीसपद पी. सी. मोदी यांच्याकडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या सरचिटणीसपदी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) माजी अध्यक्ष पी. सी. मोदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अवघ्या दहा आठवड्यांपूर्वी पीपीके रामचार्युलू यांच्याकडे हे पद सोपविण्यात आले होते. मात्र, संसद अधिवेशनाला सामोरे जाण्याआधीच तडकाफडकी त्यांची गच्छंती झाली.

हेही वाचा: पाकमुळे अडलेला भारताचा गहू अफगाणकडे जाणार? खान म्हणतात, 'माणुसकीने विचार केला तर...'

संसदेमधील (लोकसभा आणि राज्यसभा) या प्रकारच्या सर्वोच्च पदावर आतापर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेच्या अधिकाऱ्यांची किंवा संसदीय सचिवालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती होत असते. याच धर्तीवर लोकसभेमध्ये उत्तराखंड केडरचे माजी सनदी अधिकारी उत्पल कुमार सिंह हे सरचिटणीस आहेत. असे असताना, राज्यसभेतील या पदी पी. सी. मोदी यांच्या रूपाने भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांची प्रथमच नियुक्ती झाली. रामचार्युलु यांची अलीकडेच म्हणजे एक सप्टेंबरला नियुक्ती झाली होती. आता त्यांच्याकडे राज्यसभा सभापतींच्या सल्लागारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राज्यसभा सचिवालयाकडून याबाबतची माहिती देताना, पी. सी. मोदी यांची नियुक्ती सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी केल्याचे सांगण्यात आले. भारतीय महसूल सेवेच्या १९८२ च्या तुकडीचे अधिकारी असलेले पी. सी. मोदी यांना सीबीडीटीचे अध्यक्ष झाल्यानंतर या पदासाठी २०१९ पासून तीन वेळा मुदतवाढ मिळाली होती.

loading image
go to top