राज्यसभेचे कामकाज आजपासून पूर्ववत

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 9 March 2021

कोरोनामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांची बदललेली आसनव्यवस्था व वेळा यांचा या अधिवेशनातील आज अखेरचा दिवस ठरला. उद्यापासून (ता.९) राज्यसभा कामकाज सकाळी ११ ला सुरू होईल व पूर्वीप्रमाणेच सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत चालेल.

नवी दिल्ली - कोरोनामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांची बदललेली आसनव्यवस्था व वेळा यांचा या अधिवेशनातील आज अखेरचा दिवस ठरला. उद्यापासून (ता.९) राज्यसभा कामकाज सकाळी ११ ला सुरू होईल व पूर्वीप्रमाणेच सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत चालेल.  

राज्यसभा सचिवालयाकडून मागच्या महिन्यात पूर्ववत कामकाज चालविण्याबाबतचा प्रस्ताव समोर आला तेव्हा ‘सकाळ’ ने त्याबाबतचे वृत्त दिले होते. कोरोना महामारीची स्थिती काही राज्यांत गंभीर असली तरी दोन सदस्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून कामकाज एकाच वेळी चालविणे शक्‍य आहे का, याची पडताळणी दोन्ही पीठासीन अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर उद्यापासून कामकाज पूर्वीप्रमाणे एकाच वेळी चालविण्याचा निर्णय घेतला. कॉंग्रेस व विरोधी पक्षांनी आज पेट्रोल-डिझेल व गॅसच्या दरवाढीवरून घोषणा देत कामकाज ठप्प केले. या मुद्यावरील चर्चेची काँग्रेसने केलेली मागणी उपसभापतींनी  फेटाळली. गोंधळ सुरू झाला आणि तीन वेळा तहकूबीनंतर कामकाज स्थगित करण्याची घोषणा पीठासीन अधिकारी वंदना चव्हाण यांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पक्षचिन्हाचा वापर नको
अनेक सदस्य आपापल्या राज्यांतील प्रचलित वेषभूषा करून संसदेत येतात. बहुतांश दाक्षिणात्य पुरूष खासदार लुंगी वापरतात. सध्याचे विरोधी पक्षनेते कर्नाटकातील विशिष्ट पद्धतीचे धोतर नेसतात. सदस्यांनी उपरणे, पगड्या किंवा अन्य वेषभूषा करताना त्यावर स्वतःच्या पक्षाचे चिन्ह वापरू नये असेही आवाहन राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी केले. आपण कोणत्याही विशिष्ट सदस्यांना उद्देशून हे सांगत नाही, तर ही सूचना सर्वांसाठी आहे, असेही नायडू यांनी स्पष्ट केले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajyasabha working continue from today