Video : खा. पवारांनी संसदेत फडणवीसांचं नाव घेतलं; अन् खा. मुंडे, खा. खडसे जोरजोरात हसू लागल्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जुलै 2019

खासदार रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे या लोकसभेत इतक्या का हसल्या, असा प्रश्न सध्या सोशल मिडियात विचारला जात आहे. या दोघींना लोकसभेच्या सभागृहात हसे न आवरल्याने त्या बाकाखाली जाऊन हसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.

पुणे : खासदार रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे या लोकसभेत इतक्या का हसल्या, असा प्रश्न सध्या सोशल मिडियात विचारला जात आहे. या दोघींना लोकसभेच्या सभागृहात हसे न आवरल्याने त्या बाकाखाली जाऊन हसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.

लोकसभेत दिंडोरीच्या खासदार भारती पवार या मराठीतून फडणवीस सरकारला शेतकरी कर्जमाफीबद्दल धन्यवाद देण्याचे भाषण लोकसभेत करत होत्या. तेव्हा खडसे व मुंडे या दोघीही त्यांच्यामागे बसून हसत होत्या. त्यांच्या हसण्याच्या कारणाचा शोध नेटकरी घेत आहेत.

याबाबत या दोघींनी अद्याप काही खुलासा केला नसला तरी त्या पवार यांच्या भाषणावर तर हसत नाहीत ना, असा सवाल सोशल मिडियात विचारला जात आहे. तसेच त्या संसदेच्या कामकाजात गंभीर नसल्याचा ठपका काही मंडळी ठेवत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raksha khadase and pritam munde could not control laugh in loksabha