सरकार शेतकरी,तरुणांना आत्महत्या करण्यास भाग पाडतंय: शरद पवारांची मोदींवर टिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

सरकार शेतकरी,तरुणांना आत्महत्या करण्यास भाग पाडतंय: शरद पवारांची मोदींवर टिका

देशाचे माजी उप-पंतप्रधान स्व.चौधरी देवालाल यांची जयंती निमित्त रविवारी इंडियन नेशनल लोकदलचे फतेहाबाद मध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशातील विरोधी पक्षातील दिग्गज नेते मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माकप नेते सीताराम येचुरी आणि जेडीयूचे महासचिव केसी त्यागी उपस्थित होते.

सभेला संबोधित करताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, ही तिसरी आघाडी नसून पहिलीच आघाडी आहे. आपण सर्व एकत्र राहीलो, तरच आपण मजबूत होऊ. आणि मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही मोकळ्यात अफवा आहेत. मी फक्त भाजपविरोधात विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे.

कारण निवडणुकीत भाजपने आमच्या उमेदवारांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला होता. केंद्र सरकारने मागास राज्यांसाठी ज्या घोषणा केल्या होत्या. मात्र सरकारने पुर्ण केल्या नाहीत. बिहारमध्ये सात पक्ष एकत्रपणे काम करत आहे. 2024 मध्ये भाजपला बिहारमध्ये निवडून येण्यासाठी कोणतीही संधी मिळणार नाही .

तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले " शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सिमेवर आंदोलन केले, परंतु केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर लक्ष दिले नाही. सरकारने शेतकरी नेत्यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारी मागे घेण्याचे अश्वासन दिले होते. मात्र केंद्र सरकारने तेही पुर्ण केले नाही. 2024 मध्ये सरकार बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून काम करण्याची वेळ आली आहे. आमचे शेतकरी आणि तरुण आत्महत्या करत आहेत. परंतु सरकारने यावर अजून ही कोणताही तोडगा काढलेला नाही.