राम सब के है : प्रियांका गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 5 August 2020

राममंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्तावर कॉंग्रेसमधून वेगवेगळे आक्षेप घेतले जात असताना सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुता आणि सांस्कृतिक संमेलनाचे केंद्र बनावे, असे म्हणत मंदिर भूमिपूजनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

नवी दिल्ली - राममंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्तावर कॉंग्रेसमधून वेगवेगळे आक्षेप घेतले जात असताना सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुता आणि सांस्कृतिक संमेलनाचे केंद्र बनावे, असे म्हणत मंदिर भूमिपूजनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राम मंदिराचा उत्तर प्रदेशातील आगामी राजकारणावर होणारा परिणाम लक्षात घेऊन ‘राम सबके है’, असे म्हणत प्रियांकांनी कॉंग्रेसची ही सौम्य हिंदुत्वाची भूमिका जाहीर केली आहे. तसेच राममंदिराबद्दल उलटसुलट बोलणाऱ्या नेत्यांनाही यातून गप्प राहण्याचा संदेश दिल्याचे मानले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रियाकांनी निवेदनात म्हटले आहे, की जगभरात आणि भारतीय उपखंडातील संस्कृतीवर रामायणाची अमीट छाप आहे. भगवान राम, माता सीता आणि रामायणाची गाथा आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक स्मृतीपटलावर विराजमान आहेत. भारतीय जनमानस रामायणातील प्रसंगांमधून धर्म, निती, कर्तव्यपरायणता, त्याग, उदात्तता, प्रेम, पराक्रम आणि सेवेची प्रेरणा घेत आले आहे.  प्रियांकांनी म्हटले आहे, की युगानुयुगे रामाचे चरित्र भारतीय भूभागात मानवतेला जोडणारे सूत्र ठरले आहे. सर्वांचे दाता राम आहेत. गांधीजींचे रघुपती राघव राजा राम सर्वांना सन्मती देणारे आहेत. तर वारिस अली शाह म्हणतात, जो रब आहे तोच राम आहे. राम साहस आहे, राम संगम आहे, राम सहयोगी आहे. राम सर्वांचे आहे. भगवान राम सर्वांचे कल्याण करणारे आहेत. म्हणूनच ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत, अशी भावना व्यक्त करताना गांधींनी, भूमिपुजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय, एकता, बंधुता आणि सांस्कृतिक संमेलनाचा प्रतिक ठरावा, असेही म्हटले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ram belongs to everyone Priyanka Gandhi