Ayodhya Ram Temple : अयोध्येतील दरबारात राजा राम विराजमान; योगी आदित्यनाथांची उपस्थिती, आठ मंदिरांत प्राणप्रतिष्ठा
Pran Pratishtha in Ayodhya : अयोध्येतील राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील राम दरबारात श्रीराम, सीता आणि अन्य मूर्तींची प्राणप्रतिष्ठा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत झाली.
अयोध्या : अयोध्येतील रामजन्मभूमीवरील मंदिरात पहिल्या मजल्यावर असलेल्या राम दरबारातील मूर्तींसह या परिसरातील आठ मंदिरांतील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आज एकाचवेळी करण्यात आली.