Ram Mandir Donation Scam नोकरीला लागताच वर्षभरात घेतली महागडी कार; गावी आलिशान घर अन् भावालाही पाठवले लाखो रुपये

Ram Mandir Donation Scam राम मंदिर चोरी प्रकरणी एसआयटी चौकशीत सीसीटीव्ही फूटेजबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरीची पद्धत आणि इतर गोष्टींचा उलगडा चौकशीतून झाला आहे. अविनाश शुक्लाने अनेक खुलासे केले आहेत.
Ram Mandir Scam

Ram Mandir Scam Accused Bought Luxury Car Within a Year

Esakal

Updated on

अयोध्येतील भव्य श्री राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाला आणि विशेष पथकाला (SIT) महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. सीसीटीव्ही फूटेजबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरीची पद्धत आणि इतर गोष्टींचा उलगडा चौकशीतून झाला आहे. न्यायालयाने अटक केलेल्या आरोपींना फक्त १३ तासांची पोलीस कोठडी दिली होती. या वेळेत केलेल्या चौकशीत मुख्य आरोपी अविनाश शुक्ला याने अनेक खुलासे केले. त्या खुलाश्यांच्या आधारे पोलिसांनी धडक कारवाई करत एक सुझुकी ब्रेझा कार (क्रमांक: UP42AP6054) जप्त केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या या कारमधून मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. SIT Reveals New Details in Ram Mandir Donation Scam

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com