Ayodhya Property Rate: अयोध्येतील जमिनींच्या दरांत तब्बल ३० ते २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. येथे ठिकाणानुसार जागेच्या दरांत वाढ झाली असून मागील आठ वर्षांनंतर नवे सरकारी दर (सर्कल रेट) नुकतेच लागू करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे..'या' मुख्यमंत्र्यांनी चक्क तमाशाला 'अश्लील' म्हणून केलं होतं बॅन .राम मंदिराच्या आसपास सुमारे १० किलोमीटर परिसरातील जागांच्या किमतीत १५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अयोध्येतील रकाबगंज, देवकाली आणि अवधविहार येथील गृहसंकुल योजना या सर्वांत महाग योजना ठरल्या आहेत, असे येथील उपनिबंधक शांतिभूषण चौबे यांनी सांगितले. या दरांबाबत सर्व आक्षेपांचे निराकरण केल्यानंतर सोमवारपासून (ता. ९) हे दर लागू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले..Skills Development: "शाळांमधील कौशल्य शिक्षण मुलांचे करिअर घडवण्यासाठी उपयुक्त"; शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांचे प्रतिपादन .अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीनंतर येथील जमिनींचे दर वाढले आहेत. मंदिर परिसरातील जागांचे दर यापूर्वी सहा हजार ६५० ते सहा हजार ९७५ प्रतिचौरस मीटर होते, ते आता २६ हजार ६०० ते २७ हजार ९०० प्रति चौरस मीटर झाले आहेत..Share Market Closing: आजचा शेअर बाजार कसा होता? सेंसेक्स अन् निफ्टीची स्थिती कशी? कुठले शेअर टॉपर राहिले? जाणून घ्या.मुद्रांक शुल्कही वाढणार‘‘सर्कल रेटमध्ये वाढ झाली म्हणजे मुद्रांक शुल्कातही वाढ होणार. याचा लाभ जमीनमालकांना होणार आहे. तसेच कर्ज मिळविण्यासाठी आणि मालमत्तेच्या मूल्यांकनातही जमीन मालकांना लाभ होणार आहे,’’ असे मत अयोध्येतील एका बांधकाम व्यावसायिकाने व्यक्त केले आहे. तर, ‘‘सरकारी दरांतच वाढ झाल्याने जमीन खरेदीविक्रीतील गैरप्रकारांना आळा घातला जाणार आहे,’’ असे मत जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या एका व्यावसायिकाने व्यक्त केले आहे..Video: पुणे पोलिसांचं गुंड हिना शेखला अभय? एफसी रोडच्या फुटपाथवर वस्तूंची नासधूस करत केला हप्ता वसूल; व्हिडिओ व्हायरल.विभागवार दरवाढअयोध्येतील जमिनींची झालेली दरवाढ ही विभागवार झाली असून यात जागेला असलेली मागणी आणि जागेचा वापर याच्या आधारे ‘निवासी’, ‘व्यावसायिक’ आणि ‘शेतजमीन’ अशी विभागणी करण्यात आली आहे..Monsoon Update: महाराष्ट्रात मान्सूनचे पुनरागमन! मुंबई-पुण्यात कोसळणार मुसळधार, 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी .सर्कल रेट म्हणजे काय?सर्कल रेट म्हणजे जमिनीचा सरकारने निश्चित केलेला किमान दर. या दरानुसारच संबंधित मालमत्तेची नोंदणी करण्यात येते. मुद्रांक शुल्क निश्चित करण्यासाठीही हा सर्कल रेटच आधार मानला जातो. तसेच जमीन अधिग्रहण करतानानाही याच दरानुसार मोबदला देण्यात येतो..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.