
लोकसभेत मंजूर झाल्यानंतर गुरुवारी राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर करण्यात आले. दुपारी १ वाजल्यापासून चर्चा सुरू आहे. एक दिवसापूर्वीच ते लोकसभेत बहुमताने मंजूर झाले. यानंतर आता राज्यसभेची पाळी आहे. या विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले मत मांडण्यासाठी उभे राहिले. तेव्हा त्यांनी तुफान फटकेबाजी केली. त्यांच्या जोरदार भाषणामुळे सभागृहात हशा पिकला होता.