esakal | सिब्बल-गुलाब नबी आझाद यांनी आता भाजपात प्रवेश करावा, आठवलेंचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Athawale,bjp, nda, Ghulam Nabi Azad,Kapil Sibal

सिब्बल आणि आझाद यांनी काँग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी मोठे योगदान दिले आहे. पण आता त्यांना पक्षातून बाहेर पडायला हवे. त्यांनी भाजमध्ये प्रवेश करावा, असे आठवलेंनी म्हटले आहे.

सिब्बल-गुलाब नबी आझाद यांनी आता भाजपात प्रवेश करावा, आठवलेंचा सल्ला

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेता गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांना काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करा, असा सल्ला दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सुद्ध एनडीए सरकार सत्तेत कायम राहिल. पुढील अनेक वर्षे मागील लोकसभाप्रमाणे चित्र दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद आणि काँग्रेसच्या अन्य काही दिग्गज नेत्यांवर भाजपच्या सूरात सूर मिसळल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असे म्हटले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणे राजीनामा देऊन या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्षांनी म्हटले आहे.  

"यूएईने मुस्लिम जगताचा विश्वासघात केला"

एएनआयच्या वृत्तानुसार, आठवले म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष निवडवरुन सध्या वाद निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी सिब्बल, आझाद भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा असे वाटते.  सिब्बल आणि आझाद यांनी काँग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी मोठे योगदान दिले आहे. पण आता त्यांना पक्षातून बाहेर पडायला हवे. त्यांनी भाजमध्ये प्रवेश करावा, असे आठवलेंनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, जर काँग्रेस पक्षात वारंवार अपमान होत असेल तर त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणे काँग्रेसला अलविदा करायला पाहिजे. यावेळी त्यांनी राजस्थानमधील काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा दाखलाही दिला. सचिन पायलट यांनी असा निर्णय घेण्याचा विचार केला होता. मात्र त्यांनी काही अटींवर पक्षात कायर राहण्याचा निर्णय घेतला, या राजकीय घडामोडीलाही उजाळा दिला. काँग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी मोठे योगदान देणाऱ्या नेत्यांवर राहुल गांधींनी आरोप करणे चुकीचे आहे, असेही आठवले यावेळी म्हणाले.    

चीनने पैंगोगच्या उत्तर भागात जे केलं, तेच भारताने दक्षिणेत करत दिलं प्रत्युत्तर

भाजपच्या नेतृत्वाखाली आणखी काही वर्षें देशात एनडीए सरकार कायम राहिल. आगामी निवडणुकीतही एनडीएला 350 हून अधिक जागा मिळतील, असा विश्वासही रामदास आठवलेंनी व्यक्त केला. सध्याच्या घडीला भाजप जनतेचा पक्ष आहे. सर्वांना एकत्रित घेऊन पक्ष पुढे आला आहे. या जोरावरच काँग्रेसला पराभूत करुन पुन्हा भाजपचे दिवसच येतील, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री आठवले यांनी व्यक्त केलाय. सिब्बल आणि आझाद काँग्रेसच्या अशा 23 दिग्गज नेत्यांमध्ये सामील होते ज्यांनी पक्षातील बदलासंदर्भात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. पक्षात अंतर्गत निवडणुका झाल्या नाहीत तर 50 वर्षें काँग्रेसला विरोधी बाकावरच बसावे लागले, असेही गुलाब नबी आझाद यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते.   
 

loading image