
राजकिशोर यांच्या डोक्यात, छातीत आणि पोटात गोळ्या झाडण्यात आल्या.
Ramgarh Election : मतदानापूर्वीच काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या, नेत्याच्या मृत्यूनं परिसरात खळबळ
रामगड : जिल्ह्यातील भुरकुंडा भागात दुचाकीवरून आलेल्या गुन्हेगारांनी काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या केलीये. या घटनेची माहिती मिळताच भुरकुंडा पोलीस, बरकागावचे काँग्रेस आमदार अंबा प्रसाद (Congress MLA Amba Prasad) व माजी आमदार योगेंद्र साओ घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी पोलीस आणि सरकारवर जोरदार निशाणा साधला.
रामगड विधानसभा पोटनिवडणुकीला (Ramgarh Assembly By-Election) अवघे काही तास राहिले असून, 27 फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाची तयारी सुरू आहे. मात्र, पोटनिवडणुकीच्या अवघ्या काही तास आधीच काँग्रेस नेत्याची हत्या करण्यात आलीये. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राजकिशोर उर्फ बिटका बौरी यांच्यावर हल्लेखोरांनी तब्बल 10 गोळ्या झाडल्या. गोळीबारात आमदार अंबा प्रसाद यांच्या प्रतिनिधीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडालीये.
राजकिशोर उर्फ बिटका हे शनिवारी रात्री घराजवळील जुन्या पेट्रोल पंपाजवळ उभे होते. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी अचानक येऊन त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी प्रथम नेत्याच्या पायावर गोळी झाडली, त्यामुळं ते खाली कोसळले. त्यानंतर गुन्हेगारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
राजकिशोर यांच्या डोक्यात, छातीत आणि पोटात गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या लागल्यानंतर काँग्रेस नेत्याला जखमी अवस्थेत स्थानिक रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच भुरकुंडा पोलीस दाखल झाले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.