

Rescue and police teams at the accident site near Panki on NH-33 in Ramgarh, Jharkhand
esakal
झारखंडच्या रामगड जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री भीषण रस्ते अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३३ वर कुजू आऊटपोस्ट हद्दीतील पांकीजवळ स्कॉर्पिओ आणि एका अज्ञात वाहनाची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात स्कॉर्पिओमधून प्रवास करणाऱ्या १३ जणांचा मृत्यू झाला असून, एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. मृतांमध्ये चार मुले, चार महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा