Ramnagar Woman Killed
esakal
तिनई घाट पुलाखाली महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ
मृतदेहाची ओळख पटली; अश्विनी बाबूराव पाटील असं अंगणवाडी शिक्षिकेचं नाव
पोलिसांनी खुनाचा गुन्हा मानून तपास सुरू केला.
रामनगर : बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तिनई घाटातील मार्संगाळ रस्ता क्रॉसजवळील पुलाखाली एका महिलेचा मृतदेह (Ramnagar Woman Killed) आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अश्विनी बाबूराव पाटील (वय ५०, रा. दुर्गानगर, नंदगड, ता. खानापूर) असे मृत महिलेचे नाव असून त्या अंगणवाडी शिक्षिका होत्या. हा खुनाचा प्रकार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.