Anganwadi Teacher Case
esakal
मृतदेहाला लोखंडी रॉड व दगड बांधून पुलाखाली पाण्यात फेकण्यात आला होता.
ट्रकचालकाने मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली.
आरोपी शंकर पाटीलला रामनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
रामनगर : नंदगड येथील अंगणवाडी शिक्षिका (Anganwadi Teacher) अश्विनी बाबूराव पाटील (वय ५०, रा. दुर्गानगर, नंदगड, ता. खानापूर) या महिलेचा खून करून तिचा मृतदेह गोवा-बेळगाव महामार्गावरील तिनईघाटानजीक पुलाखाली मृतदेहाला लोखंडी रॉडच्या साह्याने बांधून त्यावर दगड ठेवून पाण्यात टाकण्यात आला होता. शिक्षिकेच्या खूनप्रकरणी नंदगड गावातीलच संशयित आरोपी शंकर पाटील (वय ३५) याला रामनगर पोलिसांनी अटक केली असून, त्याची सोमवारी दिवसभर चौकशी सुरू केली.