राष्ट्रपतींचे अभिभाषण : तिरंग्याचा अपमान होणं दुर्दैवी- रामनाथ कोविंद

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 29 January 2021

संसदेत अर्थसंकल्पीय सर्वे सादर होण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद याचं अभिभाषण 

नवी दिल्ली- संसदेत अर्थसंकल्पीय सर्वे सादर होण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपलं अभिभाषण केलं. अभिभाषणावर 16 पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे ते आपल्या अभिभाषणात काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. रामनाथ कोविंद संसदेकडे रवाना झाले आहेत. 

राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील प्रमुख मुद्दे--

- शेतकऱ्यांना दीडपट भाव देण्याचा निर्णय

- अटल टनल योजना, सडक योजना देशाच्या प्रगतीसाठी

-पूर्व आणि पश्चिम फ्रँट कोरिडोर देशवासियांना समर्पित, उद्यागधंद्यांना चालना मिळण्यासाठी महत्त्वाचं पाऊल

- ऑगस्टनंतर 32 हजार अब्ज डॉलर्संची देशात गुंतवणूक

- दिल्लीत ड्रायव्हर लेस रेल्वेचे उद्घाटन

- उत्तर-पूर्व राज्यांच्या विकासासाठी कटीबद्ध

- अर्थव्यवस्थेत तेजीने सुधारणा केल्या जात आहेत, ज्या अनेक काळांपासून केल्या गेल्या नव्हत्या

- नव्या संसद इमारतीसाठी सरकारने पाऊल उचललं. नव्या संसदेमुळे आपलं काम बजावण्यासाठी अधिक सुविधा मिळतील. 

- डिजिटल इंडियाच्या ताकदीमुळे कोरोना काळातही भारत थांबला नाही, ई-स्टॅप उपलब्ध, जनधन खात्यांमुळे गरिबांना फायदा. आधारकार्ड मुळे गरिबांना थेट मदत, 

- आदिवासी आणि मागास लोकांच्या व्यक्तीसाठी विशेष प्रयत्न

-- उद्यमशीलतेचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी सरकारचे प्रयत्न, तरुणांना संधी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत

- स्वरोजगारासाठी मुद्रा योजनेअंतर्गत अनेकांना कर्ज देण्यात आले आणि दिनदयाल योजनेअंतर्गंत तरुणांना संधी, महिलांना विशेष लाभ

- महिलांना विशेष सवलती. महिलांना सर्व क्षेत्रात संधी दिली जात आहे

- राष्ट्रीय शिक्षा निती अंतर्गत आपल्या आवडीनुसार करिअर निवडण्याची संधी, दिश पोर्टलला देश पातळीवर उभे केले

- 3 कोटी 20 लाख विद्यार्थ्यांना सरकारच्या विविध शिष्यवृत्तींचा लाभ मिळत आहे

-सबका साथ, सबका विकास, सबका विश्वासासाठी सरकार कटीबद्ध

- दिव्यांगासाठी आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी अनेक सवलती आणि सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत

-सरकारने एमएसपीवर कृषी उत्पादन विकत घेत आहे, देशात एनेक एमएसपी केंद्रे निर्माण केले जात आहे

- अनेक भागांना मायक्रो इरिगेशन मिळत आहे, शेतकरी याचा फायदा घेण्याची आशा आहे

- देशात अन्न-धान्य, फळांचे उत्पादन वाढले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे अभिनंदन

- देशात 80 टक्के शेतकऱ्य़ांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. असे देशात 10 कोटी शेतकरी आहेत. सरकारकडून पंतप्रधान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत. 

- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचे आमचं सरकार सन्मान करते

- पवित्र प्रजासत्ताक दिनी गोंधळ होणे दुर्भाग्यपूर्ण. शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा चुकीचा वापर झाला

- कृषी कायद्यांमुळे कोणत्याही सुविधा काढून घेण्यात आल्या नाहीत. उलट नव्या सुविधा आणि अधिकार देण्यात आले आहेत

- शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवण्यासाठी पशूधनाचाही समावेश करण्यात आला आहे

- कोरोना महामारीच्या काळात भारतीयांनी विषाणूविरोधात लढा दिला

--कोरोना काळातच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देशाने गमावलं

- सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे कोरोना काळात अनेकांचे प्राण वाचले, कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे.

- कोरोना काळात सरकारने आर्थिक पॅकेजची घोषणा केली, कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी घेण्यात आली.

- एन नेशन एक रेशनकार्ड योजनेमुळे अनेक गरिबांना फायदा झाला, कोरोना काळात सरकारे आपलं कर्तव्य योग्यपणे निभावलं

- पंतप्रधान मोदींनी सांगितलेल्या आत्मनिर्भर भारताचे महत्व पटले

-2200 लॅबोरेटरी तयार करण्यापासून पीपीई कीट, मास्कचे मोठ्या प्रमाणात देशात उत्पादन झाले.

- भारतात सर्वात मोठे लसीकरण अभियान हाती घेण्यात आले आहे, देशातील दोन कोरोना लस वापरल्या जातात.

-आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 1.5 कोटी लोकांना 5 लाखांपर्यंत मदत मिळत आहे. 

- जन औषधे केंद्रामुळे (7000 केंद्रे) देशातील अनेक गरिबांना फायदा होत आहे. 

- 22 एम्सना नव्याने मंजुरी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramnath kovind speech parliament Economic Survey 2021