भारतीय माध्यमांसाठी सध्या संकटाचा काळ - रवीशकुमार

पीटीआय
Tuesday, 10 September 2019

भारतीय माध्यमे सध्या संकटाच्या काळातून जात आहेत. ही परिस्थिती अपघाताने नव्हे; तर पद्धतशीपपणे तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पत्रकारितेवरील संकट व्यवस्थित समजून घेणे गरजे बनले आहे, असे मत भारतीय पत्रकार रवीशकुमार यांनी आज रॅमन मॅगसेसे पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना व्यक्त केले.

मनिला - भारतीय माध्यमे सध्या संकटाच्या काळातून जात आहेत. ही परिस्थिती अपघाताने नव्हे; तर पद्धतशीपपणे तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पत्रकारितेवरील संकट व्यवस्थित समजून घेणे गरजे बनले आहे, असे मत भारतीय पत्रकार रवीशकुमार यांनी आज रॅमन मॅगसेसे पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना व्यक्त केले.

फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे आज रवीशकुमार यांच्यासह इतर चार जणांना 2019च्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारांनी गौरविण्यात आले. 'प्रत्येक लढाई ही जिंकण्यासाठी लढली जात नाही; तर कोणीतरी लढतोय हे जगाला कळावे यासाठीही लढली जाते. मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाल्यापासून माझे जग बदलून गेले आहे. या देशाने दिलेला सन्मान आणि इथला पाहुणचार बघून मी भारावून गेलो आहे,'' अशा शब्दांत रवीशकुमार यांनी भावना व्यक्त केल्या.

रवीशकुमार यांच्यासह म्यानमारचे पत्रकार को स्वे विन, थायलंडमधील मानवी हक्क कार्यकर्त्या अंगखान नीलापैजीत, फिलिपिन्समधील संगीतकार रेमुंडो पुजांते कायाबयाब आणि दक्षिण कोरियामध्ये तरुणांमधील हिंसा, मानसिक आरोग्यासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते किम जोंग-की यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले. यंदा हा पुरस्कार पाच जणांना देण्यात आला. त्यात रवीशकुमार एकमेव भारतीय आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramon magsaysay award Declare