

Chaku Nagri
esakal
उत्तर प्रदेशातील प्रत्येक शहराची एक वेगळी ओळख आहे. कोणी आपल्या पेढ्यांसाठी प्रसिद्ध आहे, तर कोणी आपल्या तहजीबसाठी. मात्र, एक शहर असे आहे ज्याची ओळख चक्क 'धारदार' शस्त्राशी जोडली गेली आहे. या शहराला 'चाकूंचे शहर' (City of Knives) म्हटले जाते आणि ते म्हणजे रामपूर.