esakal | इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात रामसेतू; तर कला शाखेसाठी रामचरितमानस
sakal

बोलून बातमी शोधा

shivraj singh chouhan

इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात रामसेतू; तर कला शाखेसाठी रामचरितमानस

sakal_logo
By
सुधीर काकडे

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना पाश्चात्य संशोधकांच्या प्रमेयांबरोबरच तुलसीदास यांनी लिहीलेले रामचरित्रमानस देखील आभ्यासावे लागणार आहे. मध्य प्रदेश सरकारने तयार केलेल्या नव्या अभ्यासक्रमानूसार पदवी आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आता रामसेतु आणि रामचरितमानसचा समावेश असणार आहे. तसेच मेडिकल क्षेत्राचा अभ्यासक्रमात देखील बदल होणार आहेत. मध्यप्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव यांनी दिलेल्या माहितीनूसार भारताची संस्कृती येणाऱ्या पिढ्यांना समजावी या हेतून हे बदल करण्यात आले आहे.

मध्यप्रदेश सरकारच्या अभ्यासक्रम समितीच्या शिफारशीनूसार उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात मोठे बदल करण्यात येणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून रामचरितमानसवर आधारित ‘रामचरीत मानस के व्यावहारिक दर्शन’ हा कोर्स देखील बीएच्या पद्विमध्ये करता येणार आहे. आम्ही येणाऱ्या काळात मेडिकल क्षेत्राचा अभ्यासक्रम बदलण्यासाठी देखील समिती स्थापन करणार आहे, अशी माहित मध्यप्रदेशचे वैद्यकिय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी दिली आहे.

"भारतीय संस्कृतीच्या मूळ स्त्रोतांमधील अध्यात्म आणि धर्म", "वेद, उपनिषद आणि पुराणातील चार युग", "रामायण आणि श्री रामचरितमानसमधील फरक" आणि "दैवी अवतार" या विषयांवर १०० गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे. तसेच, प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या फाउंडेशन कोर्समध्ये, सी राजगोपालचारी यांच्या महाभारताची प्रस्तावना शिकवली जाणार आहे.

हेही वाचा: PM मोदी करणार ७७५ कोटींच्या 'डिफेन्स कॉम्प्लेक्स'चे उद्घाटन

कॉंग्रेस नेते आरिफ मसूद यांनी पत्रकारांशी बोलताना, भाजप सरकारने रामचरितमानससह गुरु ग्रंथ साहिब, कुराण आणि बायबलचा देखील अभ्यासक्रमात समावेश केला असता बरे झाले असे मत मांडले. तसेच, मुलांना अधिक माहिती मिळेल असेही ते पुढे म्हणाले. आपला गौरवशाली इतिहास येणाऱ्या पिढ्यांना समजावा या हेतूने हे सर्व बदल करण्यात आले असे मत, मध्यप्रदेशचे उच्च शिक्षणमंत्री मोहन यादव यांनी सांगितले आहे. तर काँग्रेसने हा शिक्षणाचे भगवेकरण करण्याचा आरोप केला आहे. या आरोपाला उत्तर देताना, हे सर्व बदल तज्ञांच्या शिफारशीनूसार करण्यात आले असल्याचे यादव यांनी सांगितले. ते पुढे असेही म्हणाले की, नासाच्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, राम सेतू हा लाखो वर्षांपूर्वी बांधलेला मानवनिर्मित पूल होता.

loading image
go to top