

traffic police booth ranchi.j
esakal
झारखंडची राजधानी रांचीमध्ये वाहतूक पोलिसांच्या कामकाजाला अधिक आधुनिक आणि पारदर्शक स्वरूप देण्यासाठी शहरातील २० प्रमुख चौकांमध्ये हायटेक ट्रॅफिक पोस्ट उभारण्यात येत आहेत. या पोस्टची रचना पारदर्शक काचेच्या भिंतींसह करण्यात आली आहे. त्यामुळे बूथच्या आत सुरू असलेल्या हालचाली बाहेरूनही स्पष्टपणे दिसणार आहेत.
ट्रॅफिक पोलिसांना ऊन, पाऊस आणि थंडीमध्ये रस्त्यावर उभे राहून ड्युटी करावी लागू नये, यासोबतच नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. महिला पोलिसांसाठी स्वतंत्र फिडिंग रूम, पोलिसांसाठी वॉशरूम आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी बाहेरून प्रवेश असलेले स्वतंत्र वॉशरूम अशा सुविधाही या पोस्टमध्ये देण्यात आल्या आहेत.