

Richest District
sakal
भारताची आर्थिक ताकद आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये मोठी संपत्ती आहे, याची माहिती देणारा एक महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे. आर्थिक सर्वेक्षणानुसार, तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्हा 'जीडीपी पर कॅपिटा' (दरडोई सकल देशांतर्गत उत्पादन) नुसार देशातील सर्वात श्रीमंत जिल्हा ठरला आहे! तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या जिल्ह्याची दरडोई जीडीपी ११.४६ लाख रुपये इतकी मोठी आहे.