

A Bihar youth who falsely claimed to secure Rank 440 in the UPSC exam was felicitated by local leaders and police before the truth emerged that the rank belonged to another candidate from Karnataka.
esakal
Civil Services Exam Fraud : नुकतेच युपीएससीचे निकाल जाहीर झाले. देशभरातली अनेक उमेदवारांनी यात यश मिळवलेय या निकालांच्या गदारोळातच, बिहारच्या शेखपुरा येथील एका गरीब कुटुंबातील रणजीत कुमारनेही आपण युपीएससी परीक्षेत ४४० वा क्रमांक (रँक) मिळवल्याचा दावा केला. त्याच्या या कथित यशाचा आनंद साजरा करत, स्थानिक राजद आमदाराने त्याला रोख रक्कम आणि एक सुटकेस भेट म्हणून दिली. शेखपुरा पोलिसांनीही कोणतीही पूर्व-पडताळणी न करता, घाईघाईने रणजीत कुमारला बोलावून त्याचा सत्कार केला. आता मात्र, पोलीस रणजीत कुमारचा कसून शोध घेत आहेत.