नोटाबंदीविरोधात तीव्र आंदोलन करणार - ममता बॅनर्जी

पीटीआय
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

कोलकाता - केंद्र सरकार प. बंगालला जाणीवपूर्वक लहान नोटांचा पुरवठा करत नसल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. इतर राज्यांना नोटांचा पुरवठा करून केंद्र सरकार बंगालबरोबर भेदभाव करत असून, याविरोधात मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

नोटाबंदीच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले असून, आज त्यांनी येथील रिझर्व्ह बॅंकेच्या कार्यालयास भेट दिली. त्या वेळी पत्रकारांशी त्या बोलत होत्या.

ममता म्हणाल्या, 'राज्याला अद्यापपर्यंत 500 रुपयांच्या नोटा पुरेशा प्रमाणात मिळालेल्या नाहीत. तसेच शंभर, पन्नास आणि दहा रुपयांच्या नोटांचाही तुटवडा भासत आहे. एकिकडे राजस्थान, मध्य प्रदेश व इतर राज्यांत या नोटा उपलब्ध झाल्या असून, केंद्र सरकार बंगालसोबत भेदभाव करत आहे.''

लोकांना त्यांच्याच खात्याची माहिती उपलब्ध होत नाही. त्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यांचे पैसे सुरक्षित आहेत का, असा प्रश्‍न ममता यांनी उपस्थित करत हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा नवीन नोटांबरोबर चलनात ठेवाव्यात, या मागणीचा पुनरुच्चार केला. तृणमूल कॉंग्रेसने केंद्र सरकारला दिलेला 72 तासांचा अल्टिमेटम सोमवारी संपत असून, परिस्थितीत सुधारणा न झाल्यास 21 नोव्हेंबरनंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी शेवटी सांगितले.

नोटाबंदीमुळे देशातील ग्रामीण भाग पुरता हैराण झाला असून, शेतकरी वर्ग अश्रू ढाळत आहे. सामान्य माणसाला खायला अन्न नाही. त्यांनी काय खायचे, प्लॅस्टिकच्या नोटा.
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rapid movement will currency ban by mamta banerjee