Rare Disease: माणूस नव्हे का? प्राण्यासारखी वागणूक देतात अन् दिसताच दगडफेक; जगात केवळ 50 लोकांना हा आजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rare Disease

Rare Disease: माणूस नव्हे का? प्राण्यासारखी वागणूक देतात अन् दिसताच दगडफेक; जगात केवळ 50 लोकांना हा आजार

Rare Disease: शरीरावर केस असणे सामान्य मानले जाते. मात्र यातही काहींच्या शरीरावर दाट तर काहींच्या चेहऱ्यावर विरळ केस असतात. मात्र भारतात असा एक मुलगा आहे ज्याच्या चेहऱ्यावर एवढे केस आहेत की त्याला बघून सुरूवातील एखादा भयानक प्राणी समजून लोक त्याला घाबरतील. १७ वर्षीय हा मुलगा एका सिंड्रोमने पिडीत आहे. या भयावह आजाराबाबत जाणून घेऊया.

१७ वर्षाच्या या मुलाचे नाव ललित पाटीदार आहे. सामान्य घरातील हा मुलगा बारावी वर्गाचा विद्यार्थी आहे. या मुलाला हायपरट्रिचोसिस म्हणजेच वेयरवोल्फ सिंड्रोम आहे. हा मुलगा जन्मताच असा. या सिंड्रोममध्ये हातावर आणि चेहऱ्यावर केसांची सामान्य माणसांच्या तुलनेत फार अधिक ग्रोथ दिसून येते. (Health)

१७ वर्षाचा ललित माध्यमांशी बोलताना त्याची व्यथा मांडतो की, "मी शाळेत जातो. सुरूवातीला मला बघून लहान मुले आणि मोठी माणसे घाबरायची. त्यांना वाटायचे मी प्राणी आहे. आणि मी त्यांना चावू शकतो किंवा नुकसान पोहोचवू शकतो. माझ्या जन्माच्या वेळी डॉक्टर्सने केसांचं शेव्हिंग केलं होतं. मात्र सात आठ महिन्यानंतर माझ्या शरीरावर केसांची असामान्य वाढ दिसून येत होती. कुटुंबियांनी त्याकडे फारसे लक्षही दिले नव्हते. काही काळानंतर हे केस एवढे वाढले की लोक त्याला बंदर बंदर म्हणत चिडवत होते."

पुढे तो म्हणतो, जेव्हा मी लहान होतो तेव्हा लोक माझ्या अंगावर दगड फेकून मारायचे. हा भयानक आजार फार कमी लोकांना होतो. या आजारास हायपरट्रिचोसिस किंवा वेयरवोल्फ असेही म्हणतात. भारतात हा आजार ललितला तर जगभऱ्यात हा आजार 50 लोकांना असल्याचे रिपोर्टचे म्हणणे आहे. या आजारात जन्मताच महिला असो किंवा पुरुष त्यांच्या अंगावर केसांची असामान्य वाढ दिसून येते.

टॅग्स :Diseasehealth