दुर्मीळ पक्ष्यांच्या शिकारीची पाककडून परवानगी

वृत्तसेवा
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

  • कतारच्या राजघराण्याला विशेष परवाना

इस्लामाबाद : पक्षिप्रेमी आणि सामान्य नागरिकांकडून जोरदार टीका होत असूनही पाकिस्तान सरकारने कतारचे अमीर आणि राजघराण्यातील इतर नऊ जणांना दुर्मीळ हौबारा माळढोक पक्षांच्या शिकारीचा परवाना जारी केला आहे. यामुळे पक्षिप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हौबारा माळढोक हे मध्य आशियातील बोचरी थंडी टाळण्यासाठी तुलनेने कमी थंड वातावरण असलेल्या पाकिस्तानमध्ये सथलांतरित होतात. या पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार होत असल्याने त्यांची संख्या कमी होऊन ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तानमध्ये हौबारा माळढोकची शिकार करण्यास बंदी आहे. तरीही दरवर्षी पाकिस्तान सरकार कतारच्या राजघराण्याला या पक्ष्यांची शिकार करण्याचा परवाना देते. यंदाही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या राजघराण्यातील दहा जणांना दहा दिवसांमध्ये शंभर पक्षी मारण्याची परवानगी देण्यात आली आहे.
 

मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीचा साडीमधला लुक एकदा पाहाच !

या शिकारी परवान्याचा वापर पाकिस्तान परराष्ट्र धोरणासारखा करते. याद्वारे तेलसंपन्न देशांमधील प्रभावशाली श्रीमंत लोकांना एक लाख डॉलरच्या बदल्यात शिकारीचा परवाना दिला जातो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rare bird hunting permission from Pakistan