Medical Discovery: कोलार येथील ३८ वर्षीय महिलेच्या रक्तात जगात याआधी न आढळलेला दुर्मीळ रक्तगट सापडला. 'सीआरआयबी अँटिजेन'च्या आधारे ब्रिटनला नमुने पाठवण्यात आले आहेत.
बंगळूर : कोलार येथील महिलेमध्ये एक अत्यंत दुर्मीळ रक्तगट आढळून आला, जो जगात इतरत्र आढळलेला नाही. कोलारमधील रुग्णालयात हृदय शस्त्रक्रियेसाठी ३८ वर्षीय महिलेला दाखल करण्यात आले, तेव्हा हा रक्तगट दिसून आला.