

History Comes Alive: State Museum Offers Free Viewing of Rare Artifacts
esakal
इतिहासप्रेमी, पर्यटक आणि विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रदेशच्या पर्यटन आणि संस्कृती विभागाने एक अत्यंत आनंदाची आणि सुवर्णसंधी आणली आहे. उत्तर प्रदेश राज्य संग्रहालयात (State Museum Lucknow) जतन करून ठेवलेल्या तब्बल ३,००0 वर्षे जुन्या ऐतिहासिक मूर्ती, प्राचीन हस्तलिखिते (पांडुलिप्या) आणि दुर्मिळ नाणी आता नागरिकांना अगदी मोफत पाहता येणार आहेत. आगामी 'आन्तरराष्ट्रीय संग्रहालय दिनाचे' औचित्य साधून प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, ३० जून २०२६ पर्यंत सर्व नागरिकांना आणि पर्यटकांना या संग्रहालयात विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.