तीन 'शिकारी' एकाच भागात; वाघ, बिबट्या आणि चित्त्याच्या दर्शनाचा अतिदुर्मीळ योग

Ranthambore Video वाघ, बिबट्या आणि चित्ता हे जगातील तीन अत्यंत दुर्मिळ शिकारी वर्गातील प्राणी एकाच भागात दिसून आले. रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुमारे ४५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या चाकल नदीच्या काठावर तिघे दिसले.
तीन 'शिकारी' एकाच भागात; वाघ, बिबट्या आणि चित्त्याच्या दर्शनाचा अतिदुर्मीळ योग
Updated on

जयपूर : राजस्थानमधील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पामध्ये अनोखा योगायोग जुळून आला. वाघ, बिबट्या आणि चित्ता हे जगातील तीन अत्यंत दुर्मिळ शिकारी वर्गातील प्राणी एकाच भागात दिसून आले. रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुमारे ४५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या चाकल नदीच्या काठावर 'झोन-९' मध्ये रविवारी ही घटना पाहायला मिळाली. साधारणपणे एक ते दोन किलोमीटरच्या परिसरात हे तिन्ही शिकारी प्राणी एकाच वेळी दिसून आल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com