Rashtrasant Tukadoji Maharaj : वयाच्या चौदाव्या वर्षी गाव सोडले अन् तुकडोजी खऱ्या अर्थाने घडले..

आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनातील काही प्रसंग जाणून घेऊयात.
Rashtrasant Tukadoji Maharaj
Rashtrasant Tukadoji Maharajesakal

Rashtrasant Tukadoji Maharaj : आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी. ११ ऑक्टोबर १९६७ साली त्यांचे निधन झाले होते. तुकडोजी महाराजांनी जगापुढे त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवला. मात्र ते खऱ्या अर्थाने कसे घडले हे तुम्हाला माहितीये का? आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनातील काही प्रसंग जाणून घेऊयात.

वयाच्या चौदाव्या वर्षी गाव सोडले

वरखेडला असताना अडकोजी महाराजांसमोर तुकड्या भजन करीत असे. त्यांच्या सानिध्यात संत तुकारामांचे नाव जोडून स्वतः माणिक अभंग रचना करायला लागला. तेव्हा ‘तुकड्या’ हे नाव जोडण्याची आज्ञा अडकोजी महाराजांनी त्याला केली. ‘तुका म्हणे’ च्या ऐवजी ‘तुकड्या म्हणे’ शब्द त्यांच्या अभंगात नंतर येऊ लागले. तुकाराम महाराजांच्या अभंगाचा त्यांच्यावर प्रभाव होता. १९२१ मध्ये अडकोजी महाराजांचे निधन झाले.

आपला भावनिक आधार नष्ट झाल्याची भावना झालेल्या तुकड्याने पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्यामुळे मनात दाटलेले सारे दुःख अश्रूंच्या रुपात बाहेर पडले. पुंडलिक हा त्याला आदर्श वाटू लागला. त्यामुळे तेथून परत यावलीस येऊन त्याने माता-पित्यांची सेवा सुरू केली. काही दिवसानंतर वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने कंटाळून आपले गाव सोडले.

रामदिधी जंगलात केली तपश्चर्या

घर सोडल्यानंतर तुकड्याने चंद्रपूर जिल्ह्यातील रामदिधी जंगलात तपश्चर्या केली. रानटी पशूंच्या सहवासात असताना एक योगी त्याला भेटला. त्याच्याकडून योगमार्गाचे ज्ञान त्याला मिळाले. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा, गोदुंडा या अरण्यामध्ये त्याने योगाभ्यास केला. यावेळी तेथील आदिवासींचे जीवन त्याला जवळून पाहता आले. अशा अनेक अनुभवांच्या भट्टी तावून- सुलाखून निघालेल्या तुकड्याला ईश्वर मंदिरात नसून माणसात शोधण्याचा ध्यास लागला.

दुःखी, कष्टी लोकांची सेवा करून त्यांच्या वेडगळ समजुती नाहीशा करणे हे त्याने आपले जीवित कार्य मानले. आपल्या मुलाला वाघाने खाल्ले अशी अफवा ऐकून बंडोजी त्याला शोधायला चिमूरला गेले. तेव्हा तो त्यांना आदिवासींच्या सहवासात आढळला. योगाभ्यास व तपश्चर्या या दोन महत्त्वाच्या गोष्टींना आदिवासींच्या सेवेचे कोंदण लाभले. त्यामुळे तुकड्या आदिवासींच्या गळ्यातील ताईत बनला.

Rashtrasant Tukadoji Maharaj
Astrology नुसार 'हे' दान केल्याने पैशांची तंगी होते दूर, घरात होईल भरभराट

भारतभर केला प्रवास

१९२५ मध्ये तुकड्याने भारतभर प्रवास केला. अनेक प्रकारच्या साधू संतांचा सहवास तीर्थयात्रेच्या निमित्ताने त्याला लाभला. त्यातून ढोंगी साधू विषयी तिरस्काराची भावना त्याच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे त्यांच्या सारखे राहण्यापेक्षा साधी राहणी त्यानी पत्कारली. त्यांच्या या साधेपणाचा प्रभाव आचार्य प्र. के. अत्रे डाॅ. वि. भि. कोलते यांच्या सारख्या विद्वानावर पडला. समाज जागृतीत व्यस्त असलेल्या तुकड्याने जाहीर भजनांचे कार्यक्रम केलेत.

समाजाला खडबडून जागे करून त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागविणे आणि जुलमी इंग्रज राजवट उलथवून टाकणे हे त्याचे ध्येय ठरले. या काळातील त्यांचे एक गीत खूप गाजले ते असे, ‘उठो जवानों करके बताओ, कहने के दिन गये.’ युवा पिढीला स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी रचलेले हे गीत स्वातंत्र्यचळवळीत चैतन्य निर्माण करणारे ठरले.

आपल्या पहाडी आवाजात खंजरीच्या तालावर गायलेल्या त्यांच्या गीतांनी श्रोत्यांची मने झंकारली होती. त्यांच्या गीतांमध्ये हे सामर्थ्य होते की त्यांच्या खंजिरीमध्ये असा प्रश्न एका महिलेला पडला. अमेरिकेतील केन्सान युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका मिस काझार्ड यांनी तुकडोजी पासून प्रेरणा घेऊन खंजिरी वाजवून नृत्य केले होते. जगभरातील श्रोत्यांना खंजरीविषयी कुतूहल निर्माण झाले. जपानमधील विश्वधर्म संमेलनात खंजिरीवर सहजपणे फिरणाऱ्या तुकडोजींच्या बोटांचे कौशल्य हे चर्चेचा विषय ठरले होते. एका साध्या वाद्याला तुकडोजीमुळे प्रतिष्ठा मिळाली.

रमेश पवार

(लेखक,व्याख्याते)

बहीशाल शिक्षण केंद्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com