
नवी दिल्ली - नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना उद्या एक दिवसाचे उपोषण करणार आहेत. या आंदोलनात आज दिल्ली-जयपूर आणि दिल्ली-आग्रा महामार्गांवर काही काळ ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकरी संघटनांचे नेते आणि सरकार यांच्यातील पुढच्या फेरीची चर्चा पुढच्या एक-दोन दिवसात होईल असे संकेत मिळाले आहेत. खात्रीलायक सूत्रांनी ‘सकाळ’ला दिलेल्या माहितीनुसार शेतकरी संघटनांचे नेते एम. एस. पी. आणि बाजार समित्यांवरील कायदा दुरुस्त्या याबाबत ठाम आहेत आणि या दुरुस्त्या संसदेच्या पुढच्या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच करण्याचे आश्वासन सरकारकडून दिले जाऊ शकते.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकरी आंदोलकांनी आज दिल्ली-जयपूर आणि दिल्ली-आग्रा हे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरले. त्यामुळे काही काळ या भागातील वाहतूक विस्कळित झाली होती. आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील विविध भागातील बंदोबस्त कडेकोट करण्यात आला आहे.
‘डीआयजीं’चा राजीनामा
कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून आपली पदके आणि पुरस्कार करणाऱ्या मान्यवरांना सोबतच आता सेवेतील अधिकाऱ्यांनी ही सहभागी होण्यास सुरुवात केली आहे. पंजाबचे डीआयजी (तुरुंग) लखमिंदर सिंह जाखड यांनी आज आपल्या दाचा राजीनामा दिला ते म्हणाले की शेतकरी अनेक दिवसांपासून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहेत आणि एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणे हे माझे कर्तव्य मी मानतो. त्यामुळे मी राजीनामा देऊन या आंदोलनात सहभागी होणार आहे.
तब्बल दोन कोटी मेल
शेतकरी आंदोलनातून तोडगा काढण्याच्या दृष्टीने केंद्राच्या विविध संस्थांतर्फे ही प्रयत्न करण्यात येत आहेत. रेल्वे टुरिझम अँड केटरिंग कार्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीच्या तर्फे शीख समाजाला एक विशेष मेल पाठवण्यात येत आहे. त्याचे शीर्षक आहे - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे शीख समुदायाशी विशेष नाते.’ ज्यांच्या आडनावात सिंग आहे आणि जे पंजाबचे रहिवासी आहेत अशा लोकांनाच निवडकपणे हे ‘मेल’ पाठवण्याचे सुरू झाले आहे. दिल्लीतील दंगा पीडितांना मदत, करतारपूर कॉरिडॉर तसेच इतर कामांची माहिती यात देण्यात आली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने केलेल्या कामांची ही यात सविस्तर माहिती आहे. ‘आयआरसीटीसी’चे प्रसिद्धी अधिकारी सिद्धार्थ सिंह यांच्या मते याच नावाची एक पुस्तिका यापूर्वी प्रकाशित करण्यात आली होती त्याच्या पार्श्वभूमीवर याचाच एक मेल आता पंजाबमध्ये सर्वत्र पाठवण्यात येत आहे. आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या ई-मेलची संख्या दोन कोटींच्या घरात असल्याचे समजते.
दिवसभरातील घडामोडी
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही सोमवारी उपोषण करणार
गुरुग्रामनजीक जयपूर महामार्गावर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला
उत्तराखंडमधील शेतकऱ्यांचे कृषी कायद्यांना समर्थन
पंजाब, हरियानातील अनेक महिला आंदोलनात सहभागी
आंदोलनाच्या समर्थनार्थ पंजाबमधील पोलिस महानिरीक्षकांचा राजीनामा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.