साडी नेसल्याने मला 'संघी' म्हणणार का?: रवीना टंडन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raveena Tondon

रवीनाच्या ट्विटला रिट्विट करताना काही जणांनी म्हटले की तुम्ही चित्रपटात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहात की 2019 मध्ये संघाकडून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहात? यावर उत्तर देताना रवीनाने मला राजकारणात रस नसल्याचे म्हटले आहे.

साडी नेसल्याने मला 'संघी' म्हणणार का?: रवीना टंडन

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने साडी दिनानिमित्त केलेल्या ट्विटवरून वादंग निर्माण झाले असून, तिच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. 

रवीनाने ट्विट करताना म्हटले होते, की साडी दिनानिमित्त मी साडी नेसल्याने मला धार्मिक, संघी, भक्त, हिंदूवादी असे म्हणण्यात येईल. मला साडी नेसायला आवडते कारण, मी साडीमध्ये सुंदर दिसते. रवीनाने साडी नेसण्याला धार्मिक रंग दिल्याने तिला ट्विटरवर ट्रोल करण्यात आले. यापूर्वीही रवीनाने रामायणावर केलेल्या ट्विटवरून तिला लक्ष्य करण्यात आले होते.

रवीनाच्या ट्विटला रिट्विट करताना काही जणांनी म्हटले की तुम्ही चित्रपटात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहात की 2019 मध्ये संघाकडून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहात? यावर उत्तर देताना रवीनाने मला राजकारणात रस नसल्याचे म्हटले आहे. तसेच आपण तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपचे प्रस्ताव धुडकावून लावल्याचे म्हटले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
बीड: धानोराजवळ खासगी बसला अपघात; 9 ठार
राजू शेट्टींवर सोडलेले सदाभाऊ अस्त्र मुख्यमंत्र्यांवर बुमरॅंग झाले !​
इंग्लंडच्या विजयाने बांगलादेश उपांत्य फेरीत; ऑस्ट्रेलियाचे पॅकअप​
आले ट्रम्प यांच्या मना...
शेतकरी आंदोलनाचं आक्रीत (आदिनाथ चव्हाण)​
यादव म्हणजेच मराठे? (सदानंद मोरे)​

#स्पर्धापरीक्षा - नोटाबंदी

loading image
go to top