भारतातही अनेक अल-जवाहिरी; त्यांना निवडून मारावे लागेल - खासदार रवी किशन

अल कायदाला मजबूत करण्यात अल-जवाहिरीने महत्त्वाची भूमिका बजावली
Ravi Kishan Latest News
Ravi Kishan Latest NewsRavi Kishan Latest News

नवी दिल्ली : अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल-जवाहिरी (Al Zawahiri) याची हत्या मोठी उपलब्धी आहे. असे अनेक अल-जवाहिरी भारतातही लपले आहेत. एका जवाहिरीच्या मृत्यूने दहशतवाद संपत नाही. एक मारला तर हे लोक हजार तयार करतात. भारतातही अल-जवाहिरी काश्मीर, आसामसारख्या भागात सक्रिय आहे. अशा सर्व अल-जवाहिरीला निवडून मारावे लागेल, असे भाजप खासदार रवी किशन (Ravi Kishan) म्हणाले.

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात अल कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरी मारला गेला आहे. ओसामा बिन लादेन अमेरिकेच्या कारवाईत मारला गेल्यानंतर जवाहिरी अल-कायदाचा नेता बनला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की, जवाहिरी त्याच्या काबुलच्या घरी कुटुंबासह लपल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचरांना मिळाली होती.

Ravi Kishan Latest News
चिंता वाढवणारी बातमी! केरळमध्ये आणखी एकाला मंकीपॉक्सची लागण; ५ वे प्रकरण

अल-जवाहिरी (Al Zawahiri) व ओसामा बिन लादेन यांनी अमेरिकेवर ९/११च्या हल्ल्याची योजना आखली होती. ओसामा बिन लादेनला २ मे २०११ रोजी अमेरिकेच्या नेव्ही सील्सने पाकिस्तानात केलेल्या कारवाईत ठार केले होते. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर ११ महिन्यांनी दहशतवादविरोधी महत्त्वपूर्ण कारवाईत अमेरिकेला हे यश मिळाले आहे.

अल कायदाला मजबूत करण्यात अल-जवाहिरीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. १९९८ पासून त्याने लादेनच्या छत्राखाली आणि नंतर त्याचा उत्तराधिकारी म्हणून काम केले. एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अल-जवाहिरी ज्या घरात मारला गेला ते घर तालिबानचा सर्वोच्च नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या एका उच्चपदस्थ सहकाऱ्याचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com