Gujarat Election : बाळासाहेब ठाकरेंचा 'तो' व्हिडीओ शेअर केल्याने रवींद्र जडेजा ट्रोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ravindra jadeja

Gujarat Election : बाळासाहेब ठाकरेंचा 'तो' व्हिडीओ शेअर केल्याने रवींद्र जडेजा ट्रोल

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणूक मतदानाच्या पहिल्या टप्प्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी जडेजाला ट्रोल केलं आहे. क्रिकेटपटू जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा भाजपकडून गुजरात विधानसभा निवडणूक लढवत आहे.

सध्या रवींद्र जडेजा पत्नीचा प्रचार करण्यात व्यस्त आहे. त्यातच त्याने बाळासाहेब ठाकरे यांचा भाषण करतानाचा व्हिडीओ शेअर केला. त्यामुळे जडेजा नेटकऱ्यांच्या रडारवर आला आहे.

हेही वाचा: Himanta Sharma: राहुल गांधी ग्लॅमरस, पण सद्दाम हुसेनसारखे दिसतात; भाजप नेत्याची जहरी टीका

रवींद्र जडेजाने शेअर केलेला व्हिडिओ जुना आहे. ज्यात बाळासाहेब ठाकरे म्हणताहेत की, मोदींचे सरकार गुजरातमधून गेले तर गुजरात गेले. यासोबतच रविंद्र जडेजाने लिहिले की, हेच आता गुजराती लोकांनी समजून घेण्याची वेळ आली आहे. जडेजाने हे ट्विट करताच सोशल मीडिया यूजर्सनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली.

या निवडणुकीत रवींद्र जडेजाची बहीण नैना जडेजा आणि त्याचे वडील काँग्रेसशी संबंधीत आहेत. या दोघांनीही काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला आहे. यावर एका युजरने लिहिलं की, जडेजाने आपल्या वडिलांचा देखील एक व्हिडीओ शेअर करायला हवा, जे काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एका युजरने पत्नीच्या पराभवाची भीती वाटत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.