आरबीआयकडून शेतकऱ्यांना 'गिफ्ट'!

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

मत्स्यपालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या कर्जावर व्याजदराच्या स्वरूपात 2 टक्क्यांचे देण्यात येणार अनुदान.

नवी दिल्ली : मत्स्यपालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या कर्जावर व्याजदराच्या स्वरूपात 2 टक्क्यांचे अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) केली. आरबीआयच्या या निर्णयामुळे असंख्य शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

मोदी सरकारने फक्त पशुपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डची सुविधा दिली आहे. त्यामुळे याच शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. व्याज अनुदानासह (Interest Subvention) छोट्या कालावधीसाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या अशा शेतकऱ्यांना 7 टक्के व्याजदरावर अनुदान मिळणार आहे.

तसेच वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्याजावर 3 टक्के अतिरिक्त सूटही मिळणार आहे. हे नियम लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांना वर्ष 2018-19 आणि 2019-20 घेतलेल्या कर्जावर फक्त 4 टक्के व्याज द्यावे लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI Announces Modalities for 2 percent Interest Subvention for Animal husbandry Fisheries Farmers