RBI MPC Meet: महागाईने RBIची डोकेदुखी वाढली! तुमचा EMI वाढणार का? काय सांगतात तज्ञ

RBI MPC Meet: अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या धोरणाचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवर होत आहे.
 RBI
RBISakal

RBI MPC Meet: देशात महागाई वाढत आहे. किरकोळ महागाई दर अजूनही उच्च पातळीवर आहे. अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने आणखी काही काळ व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत पुढील महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक बैठकीत पुन्हा एकदा व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

एमपीसीची बैठक यावेळी 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. यामध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) रेपो दर वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेते, ज्याचा थेट परिणाम गृहकर्जापासून ते वैयक्तिक कर्जापर्यंतच्या लोकांच्या EMI वर होतो.

किरकोळ महागाई कमी करण्यासाठी आरबीआयने गेल्या वर्षी रेपो दरात 2.50 टक्क्यांनी वाढ केली होती. परंतु देशातील महागाईचा दर अजूनही जास्त आहे. या वर अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणाचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवर होत आहे.

तज्ञांचे काय मत आहे?

पीटीआयच्या बातमीनुसार, बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणतात की, यावेळीही आरबीआय व्याजदरात कोणताही बदल करणार नाही. महागाईचा दर अजूनही जास्त आहे. महागाईबाबत आरबीआयचा अंदाज योग्य मानला तर ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीतही तो 5% पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारी-मार्च तिमाहीतही रेपो दरात कोणताही बदल होणार नाही.

 RBI
म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ

मदन सबनवीस म्हणाले की, खरीप पिकांचे आणि विशेषतः कडधान्यांचे उत्पादन आणि भाव याबाबत अनिश्चितता आहे. याचा परिणाम महागाईवरही होणार आहे. किरकोळ महागाईच्या अलीकडील आकडेवारीवर नजर टाकली तर ऑगस्टमध्ये ती 6.83 टक्के होती. तर जुलैमध्ये ती 7.44 टक्के होती.

 RBI
India-Canada: भारत कॅनडा वादामुळे महागाई वाढणार? अशाप्रकारे बिघडू शकते तुमचे आर्थिक गणित

ICRA लिमिटेडच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर म्हणतात की, टोमॅटोच्या किंमती घसरल्यामुळे सप्टेंबरमध्ये महागाई दर 5.3 ते 5.5 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. तरीही, ऑक्टोबरच्या एमपीसीची बैठकीत रेपो दरात कोणताही बदल होणार नाही. रिझर्व्ह बँकेने 2023-24 मध्ये किरकोळ महागाई दर 5.4 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com