Salary and Pension Hike : मोदी सरकारचा मोठा निर्णय! आरबीआय, नाबार्ड अन् जनरल विमा कर्मचाऱ्यांच्या पगारात अन् पेन्शनमध्येही वाढ

Modi government approves salary hike and pension increase : जाणून घ्या, कुणाच्या पगारात नेमकी किती वाढ झाली आहे? अनेक दिवसांपासून पेन्शनमधील सुधारणेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
RBI, NABARD and General Insurance employees to benefit from salary hike and pension revision approved by the Modi government.

RBI, NABARD and General Insurance employees to benefit from salary hike and pension revision approved by the Modi government.

esakal

Updated on

Government Decision on RBI, NABARD and Insurance Employees : केंद्रातील मोदी सकारने पेन्शन अन् पगार वाढीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) आणि सार्वजनिक क्षेत्रातील जनरल विमा कंपन्या (पीएसजीआयसी) यांच्या तब्बल ४६ हजार कर्मचारी अन् ४६ हजारांपेक्षा अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वेतन अन् पेन्शन सुधारणा मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून पेन्शनमधील सुधारणेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

आरबीआय निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पेन्शन व महागाई सवलतीवर १० टक्के वाढ मंजूर झाली आहे. तर नाबार्डमधील ग्रुप 'अ', 'ब' व 'क' कर्मचाऱ्यांना २० टक्के वेतन-भत्त्यात वाढ मिळेल. तर पीएसजीआयसी कर्मचाऱ्यांसाठी एकूण वेतन बिलात १२.४१ टक्के वाढ आणि मूलभूत वेतन व महागाई भत्त्यात १४ टक्के वाढ मिळणार आहे.

आरबीआयच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पेन्शन व महागाई सवलतीवर १ नोव्हेंबर २०२२ पासून १० टक्के वाढ मंजूर करण्यात आली आहे. तर नाबार्डमधील ग्रुप 'अ', 'ब' व 'क' कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २०२२ पासून २० टक्के वाढ मिळणार आहे. तसेच, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनला पूर्वीच्या आरबीआय-नाबार्ड पेन्शनशी जुळवून घेतले जाणार आहे.

RBI, NABARD and General Insurance employees to benefit from salary hike and pension revision approved by the Modi government.
Mumbai Mayor Election : मुंबईत ‘खेला’ होणार, महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार? ; बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना आवाहन!

याचबरोबर, पीएसजीआयसी, कर्मचाऱ्यांसाठी वेतन सुधारणा १ ऑगस्ट २०२२ पासून लागू होणार आहे. १ एप्रिल २०१० नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत सरकारचे योगदान १० टक्क्यांवरून १४ टक्के करण्यात आले आहे. आणि कुटुंब पेन्शनसाठी ३० टक्के एकसमान दर लागू करण्यात आला आहे. ही माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com