देशात बनावट नोटांची संख्या वाढली, विरोधकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल | RBI Report On Fake Notes | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi And Fake Notes

देशात बनावट नोटांची संख्या वाढली, विरोधकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालातून विरोधी पक्षांना नवीन दारुगोळा मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या (Demonetization) २०१६ मधील निर्णयावर जोरदार हल्लाबोल विरोधकांनी केला. आरबीआयच्या अहवालानुसार, बनावट नोटांची संख्या आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये वाढली आहे. आरबीआयने (RBI) १०१.९ टक्क्यांपेक्षा अधिक ५०० रुपयांच्या बनावट नोटा (Fake Notes) आणि ५४.१६ टक्क्यांपेक्षा अधिक २००० रुपयांच्या बनावट नोटा शोधल्या आहेत. (RBI Report Shows Fake Notes Increases In Country, Opposition Parties Attack On Modi Government)

हेही वाचा: कर्जवसुली करताना ‘आरबीआय’च्या नियमांना हरताळ

या शिवाय काळा पैसा संपवणे, नकली नोटा हद्दपार करणे आदी कारणामुळे नोटाबंदीचा निर्णय केंद्र सरकारने २०१६ मध्ये घेतला होता. आता या नवीन अहवालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते राहुल गांधी ट्विट करत म्हणाले, नोटाबंदीचा केवळ दुर्भाग्य यशामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची दुर्दशा झाली आहे.

हेही वाचा: नोटाबंदी, कलम ३७० रद्द करुनही दहशतवाद थांबलेला नाही - राहुल गांधी

तसेच तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते डेरेक ओ'ब्रिएन ट्विट करत हल्ला केला आहे. नमस्कार पंतप्रधान मोदी. नोटाबंदी ? आठवल का ? आणि ममता बॅनर्जी यांनी तुम्हाला धारेवर कसे धरले होते? कसे तुम्ही देशाला वचन दिले होते, की नोटाबंदीमुळे बनावट नोटा हद्दपार होतील. हा आहे आरबीआयचा अहवाल त्यातून बनावट नोटा वाढल्याचे स्पष्ट झाले आहे, असा प्रश्न त्यांनी मोदी सरकारला केला.

Web Title: Rbi Report Shows Fake Notes Increases In Country Opposition Parties Attack On Modi Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top