Delhi Elections : दिल्लीत झालेल्या पराभवावर काँग्रेस म्हणते...

वृत्तसंस्था
Tuesday, 11 February 2020

- चोप्रा देणार राजीनामा

- आपची 58 जागांवर आघाडी

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. त्यामध्ये आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचा करिष्मा पुन्हा एकदा दिसला. मात्र, काँग्रेसला एकही जागा अद्याप मिळाली नाही. ''या निवडणुकीत आम्ही चांगले काम केले पण अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, यापुढेही आम्ही असेच काम चालू ठेऊ. पराजयातून नवीन काहीतरी शिकायला मिळतं'', असे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काँग्रेसने पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केले. यावेळी दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा हेही उपस्थित होते. सुरजेवाला म्हणाले, आम्ही असेच काम पुढेही चालू ठेऊ. पराजयातून नवीन काहीतरी शिकायला मिळतं. चार-पाच टप्प्यातील कल समोर आले आहेत. उर्वरीत निकाल येणे बाकी आहे. मात्र, आम्ही अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन करतो. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. निवडणुकीतील प्रत्येक पराभव काहीतरी शिकवतो. जनादेश मिळाला नाही याची पूर्ण कल्पना आहे. पण यापुढेही आम्ही असेच काम सुरु ठेऊ, असेही ते म्हणाले.

Delhi Elections : काँग्रेस शून्यावरच; दिल्ली प्रदेशाध्यक्ष देणार राजीनामा

सुभाष चोप्रा म्हणाले, काँग्रेस पक्ष सर्वांसोबत उभी आहे, असेल आणि यापुढेही राहणार आहे. जेव्हा मी अध्यक्ष झालो तेव्हापासून मला झोप नाही. आम्ही आत्तापर्यंत संघर्ष करत आलो आहे. यापुढेही आता संघर्ष करणार आहे. 

चोप्रा देणार राजीनामा

काँग्रेस अजूनही भोपळ्यावरच आहे. याच मानहानिकारक पराभवामुळे दिल्लीचे काँग्रेस अध्यक्ष सुभाष चोप्रा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

आपची 58 जागांवर आघाडी

भाजप व काँग्रेसला धोबीपछाड देत आप जवळपास ५८ जागांवर आघाडीवर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reaction of Congress Party after Delhi Elections Results