esakal | ...म्हणून कमी होत आहेत बॅचलर्स पार्टी
sakal

बोलून बातमी शोधा

...म्हणून कमी होत आहेत बॅचलर्स पार्टी

हा निष्कर्ष न्यूयार्कमधील एका विवाह नियोजन संस्थेने लावला आहे.

...म्हणून कमी होत आहेत बॅचलर्स पार्टी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

न्यूयाॅर्क : सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात जरी साता समुद्रापारचे मित्र आपल्या जवळ आले आहेत असे वाटू लागले असले, तरी देखील याच सोशल मीडियाने आपल्याला जवळच्यांपासून लांब केले आहे. तसेच आपले जीवनमान देखील भरपूर प्रमाणात बदलू लागले आहे. ज्यामुळे काही आधीच्या प्रथा किंवा संस्कृती हळूहळू लोप पावत चालल्या आहेत. यातीलच एक म्हणजे 'बॅचलर्स पार्टी' .

हा निष्कर्ष न्यूयाॅर्कमधील एका विवाह नियोजन संस्थेने लावला आहे.  या संस्थेच्या माहितीनुसार आजकाल बॅचलर्स पार्टी फार कमी प्रमाणात साज-या केल्या जात आहेत. त्यामुळे विवाहाआधीची एक मित्रांसोबतची धम्माल रात्र साजरी करण्यापासून अनेकजण वंचित राहू लागले आहेत. बॅचलर्स पार्टी साजरी न होण्यामागची कारणे देखील या संस्थेने सांगितली आहेत. 

सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सध्याच्या पिढीचे लग्नाचे वय आधीच्या काही वर्षांपूर्वी अर्थात 90 च्या दशकात आताच्या मानाने कमी वयात मुलामुलींची लग्न होत. त्यामुळे अनेक प्रकारच्या गोष्टी किंवा भटकंती ही त्या वेळेस केलेली नसायची. मात्र सध्याच्या वेगवान जगात प्रत्येक जण कमी वयातच अनेक गोष्टी करू लागले आहेत. त्यामुळे लग्नाचे वय होईपर्यंत मित्रांसोबत करायच्या अशा कोणत्या गोष्टी राहतच नाहीत. त्यामुळे बॅचलर्स पार्टीचे वेड हळूहळू कमी होऊ लागले आहे.

यानंतरचे एक कारण म्हणजे सध्या शिक्षण, नोकरी इत्यांदीसाठी लोक आपल्या पूर्वीच्या ठिकाणांपासून स्थलांतरीत होऊ लागले आहेत, ज्यामुळे बालपणीचे तसेच महाविद्यालयीन मित्र मैत्रिणी सोबत नसल्याने देखील या बॅचलर्स पार्टींचे प्रमाण कमी झाले आहे.

तसेच पूर्वीच्या काळी बॅचलर्स पार्टी म्हटली की विवाहाआधीची एक रात्र मित्राच्या घरी किंवा एखाद्या हॅाटेलात वैगेरे भेटून सर्वजण पार्टी साजरी करायचे, मात्र सध्या भेटणे इतके कमी होऊ लागले आहे की, जेव्हा कधी एखाद्या कारणाने भेटणे होते तेव्हा किमान 3 ते 4 दिवस सर्वजण एकत्रपणे ते दिवस साजरे करतात. ज्याला खर्च देखील जास्त होतो, त्यामुळे खर्च हे ही एक कारण होऊ लागले आहे बॅचलर्स पार्टी कमी साज-या होण्याचे. 

अशाप्रकारे एक न अनेक कारणांमुळे तरूणाईची आवडती बॅचलर्स पार्टी साजरी होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र असे असले तरी अनेकजण आजही उत्साहात आपली बॅचलर्स पार्टी साजरी करतात. त्यामुळे वरील कारणांचा फरक तुमच्यादेखील बॅचलर्स पार्टीवर पडेल असे वाटत असेल, तर आताच त्याबद्दल काहीतरी उपाय करा जेणेकरून तुम्हाला तुमची अविवाहित म्हणूनची शेवटची रात्र यादगार बनवता येईल.

loading image
go to top