
जगात पुन्हा मंदीचे सावट? IMF ने कमी केला जागतिक विकास दराचा अंदाज
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणे निधीने (International Monetary Fund) मंगळवारी (ता. २६) पुन्हा एकदा जागतिक वाढीचा अंदाज कमी केला आहे. उच्च चलनवाढ आणि युक्रेन युद्धामुळे डाउनसाइड धोके निर्माण होत असल्याचा इशाराही दिला आहे. अनियंत्रित सोडल्यास ते जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीच्या (Recession) उंबरठ्यावर ढकलू शकतात.
आंतरराष्ट्रीय नाणे निधीने (IMF) आपल्या जागतिक आर्थिक आउटलुकच्या अद्यतनात म्हटले आहे की, जागतिक वास्तविक जीडीपी वाढ २०२२ मध्ये ३.२ टक्के होईल. एप्रिलच्या अंदाजानुसार तो ३.६ टक्के होता. चीन आणि रशियामधील मंदीमुळे (Recession) जगातील जीडीपी प्रत्यक्षात दुसऱ्या तिमाहीत कमी झाली आहे, असेही यात म्हटले आहे.
हेही वाचा: सोनियांची चौकशी संपली, सहा तासांनंतर ईडी कार्यालयातून बाहेर; उद्या बोलावले
कडक आर्थिक धोरणाच्या परिणामाचा हवाला देत आयएमएफने २०२३ चा वाढीचा अंदाज एप्रिलच्या ३.६ टक्क्यांवरून २.९ टक्के केला आहे. २०२० मध्ये कोरोनामुळे जागतिक उत्पादन ३.१ टक्क्यांनी कमी होऊन २०२१ मध्ये जागतिक विकास दर ६.१ टक्क्यांवर पोहोचला. यूएससाठी आयएमएफने १२ जुलै २०२२ मध्ये २.३ टक्के आणि २०२३ मध्ये एक टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. त्याचवेळी आयएमएफने २०२२ साठी चीनचा (China) जीडीपी वाढीचा अंदाज ४.४ वरून ३.३ पर्यंत कमी केला आहे.
त्याचवेळी आयएमएफने म्हटले आहे की, पाश्चात्त्य देशांनी आर्थिक आणि ऊर्जा निर्बंध कडक केल्यामुळे रशियाची अर्थव्यवस्था २०२२ मध्ये ६.० टक्के आणि २०२३ मध्ये ३.५ टक्क्यांनी संकुचित होण्याचा अंदाज आहे. तसेच युक्रेनची अर्थव्यवस्था युद्धामुळे सुमारे ४५ टक्क्यांनी संकुचित झाल्याचा अंदाज आहे. त्याचा भारतावरही परिणाम होईल. २०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७.४ टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. तर २०२३ मध्ये तो ६.१ टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.
Web Title: Recession World Imf Global Growth Forecast
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..