
सोनियांची चौकशी संपली, सहा तासांनंतर ईडी कार्यालयातून बाहेर; उद्या बोलावले
नवी दिल्ली : सोनिया गांधी (Sonia Gandhi) मंगळवारी (ता. २६) दुसऱ्यांदा अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाल्या. नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी (Sonia Gandhi) ईडीसमोर (ED) हजर होण्याची ही दुसरी वेळ आहे. सोनिया गांधी यांची आजची चौकशी संपली आहे. सहा तासांनंतर सोनिया ईडी कार्यालयातून बाहेर पडल्या. (Sonia Gandhi Latest Marathi News)
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी सोनिया गांधी यांची सहा तास चौकशी केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. २७) पुन्हा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना चौकशीसाठी बोलावले आहे. आज त्यांची दोन फेऱ्यांमध्ये चौकशी करण्यात आली. दुसरीकडे, सोनिया गांधी यांची चौकशी सुरू असताना काँग्रेस नेत्यांनी रस्त्यावर निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले
सोनिया गांधी या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह दिल्लीतील एपीजे अब्दुल कलाम रोडवरील विद्युत लेनमध्ये असलेल्या ईडीच्या (ED) कार्यालयात सकाळी ११ वाजता पोहोचल्या. यानंतर ईडी कार्यालयातून दुपारच्या जेवणासाठी निघाल्या. तसेच दुपारी साडेतीन वाजता परत आल्या. याप्रकरणी २१ जुलै रोजी सोनिया गांधी यांची पहिल्यांदा दोन तास चौकशी करण्यात आली होती. याच प्रकरणी राहुल गांधी यांची ५० तासांहून अधिक चौकशी झाली आहे.
हेही वाचा: Monkeypox : मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी सरकारने उचलली ही प्रभावी पावले
काँग्रेसने (Congress) ईडीच्या कारवाईला राजकीय द्वेषाचे कृत्य म्हटले आहे. आज राहुल गांधी आणि इतर काँग्रेस खासदारांनी संसद भवनापासून मोर्चा काढला. हे सर्वजण राष्ट्रपती भवनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, पोलिसांनी त्यांना विजय चौकात अडवले. यानंतर या नेत्यांनी तेथे धरणे दिले. यानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतले.
Web Title: Sonia Gandhi Congress Interrogation Ed Office
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..