Satara : बोंडारवाडी धरणास तत्त्वतः मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

Satara : बोंडारवाडी धरणास तत्त्वतः मान्यता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केळघर : तांत्रिक बाबी तपासून कण्हेर धरणात उपलब्ध असलेल्या सहा टक्के पाण्यातून पिण्यासाठी व शेतीसाठी जावळी तालुक्यातील ५४ गावांसाठी बोंडारवाडी धरण मंजुरीसाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज तत्त्वतः मान्यता दिली आहे.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

जिल्हाधिकारी कार्यालयात श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपजिल्हाधिकारी विजया यादव, प्रांताधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी रमेश काळे, बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी सिंह यांनी या धरणाच्या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता दिली आहे. जिल्हाधिकारी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

हेही वाचा: बापरे! भारत-पाक सामना एवढ्या लोकांनी पाहिला; Viewership चा नवा विक्रम

या वेळी डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘पाण्याविना मेढा व केळघर विभागातील ५४ गावांतील ग्रामस्थांना विविध हाल अपेष्टांना भोगाव्या लागत आहेत. कण्हेर धरणाच्या ६ टक्के पाण्यातून बोंडारवाडी धरण बांधले, तर ५४ गावांना गुरुत्वाकर्षण पद्धतीने बंदिस्त पाइपलाइनने पाणी मिळेल. याचा उपयोग शेतीसाठी व पिण्यासाठी निश्चित होईल. त्यामुळे १० हजार कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी आवश्यक पाण्याची तरतूद होऊ शकेल. २५०० हेक्टर शेतीला पाणी मिळेल. त्यामुळे आधुनिक शेती कृषी पर्यटन केंद्राची उभारणी करणेही शेतकऱ्यांना शक्य होईल. त्यामुळे रोजगारासाठी मुंबई व पुण्याला जाणारे लोंढे थांबतील.’’ यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांना पाणी मिळाले पाहिजे हे तत्त्वतः मान्य करून तांत्रिक बाबी तपासून कण्हेर धरणाच्या ६ टक्के पाण्यातून शेती व पाण्यासाठी धरण व्हावे, याबाबतचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठवणार असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी सिंह यांनी धरणाच्या प्रश्नांबाबत घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे हा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा डॉ. पाटणकर व श्री. मोकाशी यांनी व्यक्त केली. या वेळी आदिनाथ ओंबळे, एकनाथ सपकाळ, आनंदराव जुनघरे, चैतन्य दळवी, संतोष गोटल, विद्या सुर्वे, उषा उंबरकर, गेनू धुंदळे, विठ्ठल पवार, विलास शिर्के, हणमंत शिंगटे, बजरंग चौधरी, राजेंद्र जाधव, विजय सपकाळ, वैभव ओंबळे, जगन्नाथ जाधव, नारायण सुर्वे, श्रीरंग बैलकर, अशोक सपकाळ यांच्यासह कृती समितीचे सभासद उपस्थित होते.

loading image
go to top