esakal | भारतात पुन्हा विक्रमी लसीकरण; आठवड्याभरात दुसऱ्यांदा मारली बाजी
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

भारतात पुन्हा विक्रमी लसीकरण; आठवड्यात दुसऱ्यांदा मारली बाजी

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : देशात लसीकरणानं आता वेग धरला आहे. त्याचीच परिणीती म्हणजे दिवसभरात लसीकरणानं नवा विक्रम नोंदवला आहे. आठवड्याभरात देशात दुसऱ्यांदा विक्रमी लसीकरण झालं आहे. आजच्या दिवशी १ कोटी ९ लाखांच्यावर लसीकरण पार पडलं, हा नवा विक्रम आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी याबाबत ट्विट केलं.

मांडवीय यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, पाच दिवसांत दोन वेळा एक कोटींहून अधिक लसीकरण पार पडलं आहे. आजचा आकडा हा सर्वाधिक लसीकरणाचा आकडा राहिला याची मोजणी अजूनही सुरुच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सक्षमपणे कोरोनाची लढाई लढत आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेशात हे देशातील असं राज्य बनलं आहे, जिथं राज्यातील संपूर्ण जनतेचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. तर काही दिवसांपूर्वी ओडिशाची राजधानी भुवनेश्वर हे असं शहर बनलं जिथल्या नागरिकांना महापालिकेकडून लसीचे दोन्ही डोस देण्यात आले.

केंद्रानं आजवर राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाना कोरोना प्रतिबंधक लसींचे ६४.३६ कोटी डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. यावर १४, ९४, ४०० डोस देण्यात येणार आहेत.

loading image
go to top