मोदींच्या वाढदिवशी विक्रमी लसीकरण

दोन कोटी जणांना लस; वर्षअखेरपर्यंत लसीकरण पूर्ण करणार
PM Modi
PM Modi sakal
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसाला कोरोना लसीकरणाचा दोन कोटींचा आकडा पार करून देशाने नवीन विक्रम नोंदविला. आज दिवसभरात (२४ तासांत) दोन कोटी २२ लाखांहून अधिक जणांना लशीची मात्रा देण्यात आली.

देशात यापूर्वी तीन वेळा २४ तासांत एक कोटी लोकांना लस देण्याचा विक्रम नोंदविण्यात आला आहे. आज तोही विक्रम देशाने मोडला. लसीकरण मोहिमेला आलेला हा वेग कायम ठेवण्याचा विश्‍वास सरकारने व्यक्त केला आहे. या वर्षाअखेरपर्यंत सर्व भारतीयांचे कोरोना लसीकरण पूर्ण करण्याचा निर्धार आरोग्य मंत्रालयाने केला आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवशी दोन कोटी जणांना लस देण्याचे उद्दीष्ट गाठण्याचा निश्चय सरकारने केला होता. प्रत्यक्षात संध्याकाळी पाचच्या सुमारासच हा टप्पा गाठला गेल्याचे को-विन अॅपवर झळकले. या अॅपवरील माहितीनुसार, एक कोटी लसीकरणाचा टप्पा दुपारी एक वाजून ४० मिनीटांनी पूर्ण झाला. त्यानंतरच्या १०० मिनीटांत ५० लाख लोकांना लसीकरण करण्यात आले.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लाडू भरवून विक्रमी लसीकरणाचा आनंद साजरा केला. ‘लसीकरणाला चरितार्थ मानून सेवारत असलेले आरोग्य कर्मचारी आणि देशवासीयांकडून पंतप्रधानांना वाढदिवसाची भेट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी भारताने नवा विक्रम करताना दोन कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक आकडा पार केला आहे. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन... वेल डन इंडिया,’ असे मंडाविया यांनी ट्विट केले आहे.

लशींची कमतरता नाही

राज्यांकडे लशींची कमतरता नाही आणि त्यांच्या मागणीप्रमाणे केंद्राकडून सतत डोस पुरविले दिले जात असल्याचा पुनरूच्चार आरोग्य मंत्रालयाने केला आहे. आज संध्याकाळपर्यंत राज्य सरकारांकडे ७ कोटी ६० लाख डोस शिल्लक आहेत. सप्टेंबर महिनाअखेर डीएनए लशीचे १ कोटी डोस देशाला मिळतील. याशिवाय कोव्हिशिल्डचे २० कोटी आणि कोव्हॅक्सीनचे ३. २५ कोटी डोस उपलब्ध होतील, असेही मंत्रालयाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

maharashtra Latest Marathi News Live Update
seven killed in Bengaluru rain tragedy
Will DK Shivakumar become Karnataka CM
Who will win West Bengal elections 2026?
Marathi News Esakal
www.esakal.com