दिलासादायक! देशात कोरोना रिकव्हरी रेटचा उच्चांक

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 6 September 2020

 तज्ज्ञांच्या मते, देशात कोरोनाच्या सामूहिक उद्रेकाला (कम्युनिटी स्प्रेड) ऑगस्टपासूनच सुरवात झालेली आहे. याला सातत्याने नकार देणाऱ्या केंद्र सरकारकडून गेला आठवडाभर या मुद्यावर बोलण्याचे टाळण्यात आल्याचे दिसते.

नवी दिल्ली : भारतात मागील तीन दिवसांपासून कोरोनाने मोठं थैमान घातलं आहे. गेल्या सलग तीन दिवसांत देशांत 80 हजाराहून जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत मागील 24 तासांची कोरोना रुग्ण बरे होण्याची ( recovery rate) आकडेवारी दिलासादायक ठरली आहे.  गेल्या 24 तासांत देशात 70 हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच 5 सप्टेंबरला एका दिवसात आतापर्यंचे उच्चांकी 70 हजार 72 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 77.23 टक्क्यांवर गेला आहे. याचबरोबर आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रुग्णांचा मृत्यूदरही (Case Fatality Rate-CFR) कमी होत असल्याचे दिसत आहे. सध्याचा कोरोनाचा मृत्यूदर 1.73 पर्यंत कमी झाला आहे.  अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने रविवारी दिली.

केंद्र सरकारच्या ड्रीम प्रोजेक्ट बुलेट ट्रेन प्रकल्पाला ब्रेक लागण्याची शक्यता

आरोग्य मंत्रालयाने प्रसिध्द केलेल्या एका आलेखानुसार, देशात 3 सप्टेंबर रोजी 68 हजार 584 कोरोना रुग्ण बरे झाले होते. तसेच 3 सप्टेंबरला 65 हजार 81 आणि 24 ऑगस्टला 57 हजार 469 रुग्ण बरे झाले होते.  तज्ज्ञांच्या मते, देशात कोरोनाच्या सामूहिक उद्रेकाला (कम्युनिटी स्प्रेड) ऑगस्टपासूनच सुरवात झालेली आहे. याला सातत्याने नकार देणाऱ्या केंद्र सरकारकडून गेला आठवडाभर या मुद्यावर बोलण्याचे टाळण्यात आल्याचे दिसते. 130 कोटी लोकसंख्येपैकी आतापावेतो फक्त 4 कोटी 77 हजार चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. रूग्णसंख्येबाबत अमेरिका व ब्राझीलपाठोपाठ सर्वाधिक 40 लाखांहून जास्त सक्रिय रूग्ण असणाऱ्या भारतातील परिस्थिती दर महिन्यागणिक भयावह होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार शनिवार सकाळपर्यंत 31 लाख 7 हजार 223 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही 77.23 पर्यंत वाढले आहे. रुग्णांची संख्या 10 लाखांहून 20 लाखांपेक्षा जास्त होण्यास केवळ 21 दिवसांचा काळ लागला आहे. 

#MokaleVha : मानसिक ताणांचे शारीरिक परिणाम | eSakal​
 

दिल्लीत पुन्हा उद्रेक 
दिल्लीत कोरोनाचा उद्रेक व मास्कसह आरोग्य नियमावली न पाळणाऱ्या बेजबाबदार लोकांचीही संख्या पुन्हा वेगाने वाढत आहे. मात्र, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मते सरकारला रुग्णांच्या वाढत्या आकड्यांची नव्हे तर लोकांचे जीव कसे वाचतील याची चिंता आहे. परिस्थिती नियंत्रणात असून घबराट उडवू नये, असेही त्यांनी आवाहन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The recovery rate of coronavirus in india touched record