

Delhi Red Fort Blast
sakal
नवी दिल्ली : लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटावरून विरोधक आक्रमक झाले असून, कडेकोट सुरक्षेचे सरकारचे दावे असताना फरिदाबादमध्ये २९०० किलो स्फोटके पोहोचली कशी, या अपयशाची जबाबदारी कोणाची अशी प्रश्नांची फैर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने झाडली आहे. यावर चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.