
स्वातंत्र्यदिनापूर्वी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. दरम्यान, लाल किल्ल्याच्या परिसरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.