उत्तराखंडमध्ये आढळला लाल कोल्हा

हिमालयात समुद्रसपाटीपासून तीन हजार मीटर उंचीवरील पर्वतरांगेत दुर्मीळ लाल कोल्ह्याने दर्शन दिले.
Red Fox
Red FoxSakal

पिठोरागड (उत्तराखंड) - हिमालयात (Himalaya) समुद्रसपाटीपासून तीन हजार मीटर उंचीवरील पर्वतरांगेत (Mountain Range) दुर्मीळ लाल कोल्ह्याने (Red Fox) दर्शन दिले. वुल्प्स वुल्प्स ग्रिफिथी असे नाव असणारा हा कोल्हा उत्तराखंडमधील (Uttarakhand) मुनसियारी भागातील भुजानी आणि खालिया परिसरात दिसला. हिमालयातील अधिवासापासून साधारणपणे ५०० मीटर खालच्या भागात हा कोल्हा गेल्या काही वर्षांत प्रथमच दिसल्याचा दावा ‘मोनल’ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र पानवर यांनी केला. (Red fox found in Uttarakhand)

ही संस्था गेल्या १० वर्षांपासून हिमालयाच्या वरील भागातील प्राण्यांच्या रक्षणासाठी काम करते. पानवर या कोल्ह्याबाबत माहिती देताना म्हणाले, की गेल्या दोन वर्षांपासून आम्ही या कोल्ह्याचा शोध घेत होतो. पण, आमचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यानंतर, आम्हाला यातील आठ उपप्रजातींच्या कोल्ह्यांनी दर्शन दिले. हा कोल्हा लाजाळू म्हणून ओळखला जातो. तो हिमालयात कमी उंचीवर सहसा आढळत नाही. मात्र, हिमालयातील मूळचे अधिवास नष्ट झाल्याने तो कमी उंचीवर दिसत असावा. हिमालयातील इतर भागावर जीवंत राहण्यासाठी तो मानवी वस्तीच्या नजीक आल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

Red Fox
कोरोना संकटादरम्यान कुणालाही 'आधार'ची सक्ती नको

हिमालयातील अधिक उंचीवरील भागात प्राण्यांचे वसतीस्थान नष्ट होण्यामागे विविध कारणे आहेत. त्यात औषधी वनस्पतींसाठी मनुष्याचा या भागात प्रवेश हेही कारण आहे. मानवी हस्तक्षेपामुळे या प्राण्यांची नैसर्गिक शिकार कमी होत असून हवामान बदलामुळे त्यांच्या अधिवासावर गदा येत आहे, असेही पानवर यांनी स्पष्ट केले.

दीर्घकालिन प्रयत्नांचे यश

हिमालयाच्या पर्वतरांगेत दुर्मीळ लाल कोल्हा किंवा अलीकडे मोनाल पक्ष्यांचा थवा दिसला होता. उत्तराखंडमधील पिठोरागडचे विभागीय वनाधिकारी विनय भार्गव याचे श्रेय दीर्घकाळापासून केलेल्या संवर्धनाला देतात. या दुर्मीळ प्राण्यांबद्दल जागृती केल्यामुळे लाल कोल्ह्यासह इतर पशुपक्ष्यांची संख्या वाढत असल्याचा दावा त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com