esakal | "लसींच्या किंमती कमी करा"; केंद्राचं 'सीरम' आणि 'भारत बायोटेक'ला आवाहन

बोलून बातमी शोधा

serum institute and bharat biotech
"लसींच्या किंमती कमी करा"; केंद्राचं 'सीरम' आणि 'भारत बायोटेक'ला आवाहन
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या लस उत्पादक कंपन्यांनी आपापल्या लसींच्या किंमती जाहीर केल्या आहेत. या किंमती कमी करा जेणेकरुन सर्वसामान्यांच्या खिशाला जास्त भार पडणार नाही, असं आवाहन केंद्र सरकारनं या कंपन्यांना केलं आहे. पीटीआयने विश्वसनीय सुत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिलं आहे.

सीरम आणि भारत बायोटेकने आपापल्या लसींच्या किंमती जाहीर केल्यानंतर त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. दोन्ही लसींच्या किंमतीत फरक असल्याचा मुद्दा उपस्थित करत या दोन्ही लसी कमी किंमतीत उपलब्ध करुन देण्याची मागणी केंद्राकडे केली होती. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली आणि किंमती कमी करण्याची विनंती केली.

हेही वाचा: आता घरातही मास्क वापरण्याची आली वेळ - नीती आयोग

पीटीआयने विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं की, केंद्र सकारने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला आपल्या अनुक्रमे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींच्या किंमती कमी करण्यास सांगितलं आहे. कारण १ मे पासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेत १८ वर्षांवरील सर्वांना मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होऊ शकेल.