Rajasthan | शर्टच्या बाह्या कापल्या, मंगळसूत्र काढलं; परीक्षेवरुन पुन्हा वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

REET Exam
शर्टच्या बाह्या कापल्या, मंगळसूत्र काढलं; परीक्षेवरुन पुन्हा वाद

शर्टच्या बाह्या कापल्या, मंगळसूत्र काढलं; परीक्षेवरुन पुन्हा वाद

देशात सध्या नीट परीक्षेदरम्यान मुलांची अंतर्वस्त्रं काढायला लावल्याबद्दलचा वाद ताजा असतानाच नव्या वादाला तोंड फुटलंय. राज्यस्थानात रीट परीक्षेदरम्या मुलींना ओढण्या आणि मुलांना शर्ट काढायला लावल्याची माहिती मिळत आहे. परिक्षार्थ्यांना मंगळसूत्र आणि कानातलेही काढायला सांगितलं आहे. (Rajasthan REET Exam)

हेही वाचा: NEET परिक्षेवेळी मुलींना अंतर्वस्त्र काढायला लावले, 5 महिलांना अटक

धौलपूरमध्ये रीट परीक्षेसाठी (REET Exam) २२ केंद्रं होती. परीक्षार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याआधी दोन तास प्रवेश देण्यात आला. जी मुलं परीक्षा देण्यासाठी फुल बाह्यांचा शर्ट घालून आली होती, त्यांना शर्ट काढायला सांगितला. तर महिला आणि मुलींना मंगळसूत्र, कानातले काढण्यास सांगण्यात आलं. तसंच ओढण्या, बँडेज, क्लिप हेही काढायला सांगितलं आणि मगच प्रवेश दिला.

हेही वाचा: NEET Exam : तपासणीच्या नावाखाली विद्यार्थिनींचे अंतर्वस्त्र काढले

या परीक्षेदरम्यान मुली रडताना दिसल्या. पूर्ण बाह्यांचा ड्रेस घातलेल्या मुलींच्या ड्रेसच्या बाह्या कापण्यात आल्या. तर हातातले धार्मिक भावनेने बांधलेले दोरेही कापले. उशिरा येणाऱ्या परीक्षार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं नाही. या मुलामुलींनी खूपदा विनवण्या करुनही त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला नाही. मग मात्र अनेकजण रडताना दिसत होते.

Web Title: Reet Exam Rajasthan Administration Forced Students To Remove Shirts And Mangalsutra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Rajasthan