

Priyanka Gandhi Son Rehan Vadra Engagement News
Esakal
काँग्रेस नेत्या आणि खासदार प्रियांका गांधी यांचा मुलगा रेहानचा साखरपुडा त्याची गर्लफ्रेंड अवीवा बेग हिच्याशी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहानच्या साखरपुड्याबाबत कुटुंबियांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रेहानच्या साखरपुड्याला दोन्ही कुटुंबीतील मोजकेच लोक उपस्थित होते. साखरपुड्यावर अद्याप कुणी प्रतिक्रिया दिलेली नाही. दोघांच्या लग्नाची तारीख अद्याप ठरलेली नाही. रेहानची होणारी पत्नी अवीवा बेग हिचं कुटुंबीय दिल्लीत राहते.